समृद्धीवर पाठलाग करून मद्यसाठा केला जप्त

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : समृद्धी महामार्गावर अवैध मद्याची वाहतूक करणार्‍याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १९ किलोमीटर पाठलाग करून कार अडवली. 
रोडचे काम सुरू असल्याने वाहतूक सिंगल लाइनने सुरू असताना सुमारे १२० किमी वेगाने धावणारी कार पुढील बाजूने वाहने उभी करून ’लाईन जॅम’ करत हडस पिंपळगाव (ता. वैजापूर) टोलनाक्याजवळ कार थांबवण्यात आली. झडतीत मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा जप्त करण्यात आला, याप्रकरणी कुख्यात आरोपी अनिल मोतीलाल जयस्वाल (४९, रा. मलकापूर) आणि शेख अलीम शेख मेहमूद (४०, रा. बार्शी टाकळी, ता. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे